प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्या अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आदी आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती
वास्तविक अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून अशा आस्थापनांच्या विरोधात कारवाई करणे अपेक्षित आहे !
मुंबई – ‘भारतीय राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतियांसाठी अस्मितेचा विषय आहे. काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. असे असले, तरी या संवेदनशील विषयी अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यांसारख्या ‘इ-कॉमर्स’ संकेतस्थळांवरून २६ जानेवारीच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रध्वजाचे रंग असलेले ‘मास्क’ बनवून त्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री चालू आहे.
त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच अशा मास्कची विक्री, उत्पादन आणि वितरण होणार नाही या दृष्टीने शासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या निवेदनाच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांच्याकडे केली आहे. यापूर्वीही १५ ऑगस्टच्या निमित्ताने वरील आस्थापनांनी याचप्रकारे राष्ट्रध्वजाचे रंग असलेले ‘मास्क’ बनवून त्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री केली होती. तरी हा गंभीर प्रकार असून संबंधित आस्थापनांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.
Before this, @amazon was selling Indian Flag printed on shoes.
Now @amazonIN selling face masks with Indian Flag printed on them. We all know what would happen when we have discard our masks.
Let’s protest lawfully against it !#AmazonInsultsNationalFlag pic.twitter.com/HyDIsIes9H
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) August 12, 2020
राष्ट्रध्वज हे सजावट करण्याचे माध्यम नाही. अशा प्रकारचे मास्क वापरल्यास शिंकणे, त्याला थुंकी लागणे, तो अस्वच्छ होणे, तसेच शेवटी वापरानंतर कचर्यात टाकणे इत्यादींमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होणार आहे आणि असे करणे हा ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा १९५०’, कलम २ आणि ५ नुसार; तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१’चे कलम २ नुसार आणि ‘बोधचिन्ह अन् नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५०’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय गुन्हा आहे. तरी शासनाने त्याची काटेकोरपणे कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या अंतर्गत दिलेले निवेदन वाचण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा –
हा मास्क ज्या संकेतस्थळांवर विक्रीसाठी उपलब्ध आहे, अशांची नावे आणि त्यांच्या लिंक्स खाली दिल्या आहेत …
• https://www.snapdeal.com/product/raunak-tiranga-mask/650206565439 |
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)