जगातील ५८ सहस्र ७०० मोठ्या धरणांपैकी बहुतेक धरणांचे आयुष्य संपत अल्याने जगाला धोका ! – संयुक्त राष्ट्रे
हिंदु राष्ट्रांत धरणे नसतील, तर तलाव आणि तळी निर्माण केली जातील !
न्यूयॉर्क (अमेरिका) – जगातील ५८ सहस्र ७०० मोठ्या धरणांपैकी बहुतेक धरणे वर्ष १९३० ते १९७० या कालावधीत बांधण्यात आली आहेत. बांधतांना त्यांची कालमर्यादा ५० ते १०० वर्षे अशी निश्चित करण्यात आली होती. कोणत्याही धरणाला ५० वर्षे होऊन गेल्यावर त्यापासून असलेला धोका वाढत जातो. धरण फुटणे, दुरुस्तीचा आणि देखभालीचा खर्च वाढत जाणे, गाळ साचण्याचे प्रमाण वाढणे, प्रणालीत तांत्रिक बिघाड होणे, असे प्रकार होतात. त्यामुळे वर्ष २०५० पर्यंत जगातील बहुसंख्य लोक अशा जुन्या धरणांच्या प्रभावक्षेत्रातच रहात असतील, अशी भीती माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालात अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, भारत, जपान, झाम्बिया, झिम्बाब्वे आदी देशांतील धरणांचे सर्वेक्षण करण्यात आले.
Most of the world’s 58,700 biggest dams are crumbling and could release enough water to fill the Grand Canyon TWICE, report warns https://t.co/Hg0lZkfnRW
— Daily Mail Online (@MailOnline) January 23, 2021
संयुक्त राष्ट्रांच्या विद्यापिठांतर्गत येणार्या कॅनडामधील ‘जल, पर्यावरण आणि आरोग्य संस्थे’ने ‘कालबाह्य होत असलेले जलसाठे : नवा धोका’ या नावाने हा अहवाल सिद्ध केला आहे. या अहवालानुसार यातील अनेक धरणांचे आयुष्यमान कधीच संपले आहे किंवा आगामी काही काळात संपणार आहे.
(सौजन्य : Kaumudy English)
या अहवालात पुढे म्हटले आहे की,
१. भारतातील मोठ्या धरणांपैकी १ सहस्र ११५ धरणे वर्ष २०२५ मध्ये साधारणपणे ५० वर्षांची होतील. ही आणि जगातील अशी अनेक जुनी धरणे धोकादायक ठरू शकतात.
२. जगभरातील मोठ्या धरणांमध्ये ७ सहस्र ते ८ सहस्र ३०० घन किलोमीटर पाणीसाठा (कॅनडाची ८० टक्के जमीन व्यापण्याएवढा) आहे. ९३ टक्के मोठी धरणे केवळ २५ देशांमध्ये आहेत.
३. ३२ सहस्र ७१६ मोठ्या धरणांपैकी (एकूण धरणांपैकी ५५ टक्के) धरणे चीन, भारत, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये आहेत.
भारतातील धरणे१. वर्ष २०२५ पर्यंत १ सहस्र ११५ मोठी धरणे ५० वर्षांची होतील. २. वर्ष २०५० पर्यंत ४ सहस्र २५० मोठी धरणे ५० वर्षांहून अधिक वयाची, तर ६४ धरणे १५० वर्षांची होतील. ३. केरळमधील १०० वर्ष जुने मुल्लपेरियार धरण फुटल्यास ३५ लाख लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. |