पुण्यातील हडपसर, रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीत भीषण आग
पुणे – पुण्यातील हडपसर भागात असलेल्या औद्योगिक वसाहतीत आस्थापनाच्या कचरा प्रकल्पाला भीषण आग लागल्याची घटना २३ जानेवारीला घडली आहे. घटनास्थळी अग्नीशमन दल आणि पोलीस दाखल झाले होते. यात जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. हडपसरमधील रामटेकडी येथे औद्योगिक वसाहत आहे. येथे कचरा प्रकल्प असून, या कचरा प्रकल्पाला रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती नागरिकांनी दिली.