पुणे येथे रेल्वे स्टेशन मास्तरांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्याची चेतावणी
पुणे – देशातील रेल्वे स्टेशन मास्तरांच्या ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोसिएशनच्या (एआयएस्एम्एच्या) वतीने विविध मागण्यांसाठी देशभर आंदोलन करण्यात आलेे. पुणे स्थानकाजवळील रेल मंडळ कार्यालय (डीआर्एम् ऑफिस) येथे रेल्वे स्टेशन मास्तरांनी अन्नत्याग आंदोलन केले. यामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या. या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे, तसेच त्यांचे इतर सहकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी चंद्रात्रे म्हणाले की, विनंती, उपोषण आणि निषेध करूनही आमच्या मागण्या मान्य होणार नसतील, तर यापुढील आंदोलनांची तीव्रता वाढवली जाईल. त्याचे दायित्व रेल्वे प्रशासनाचे राहील.
रात्रपाळीच्या सिलिंग मर्यादेचा आदेश रहित करावा, रेल्वेचे खासगीकरण आणि कंत्राटीकरण बंद करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी यांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.