यवतमाळ येथे जन्मत: दोष असणार्या बाळांवर उपचार करणार्या केंद्राचे उद्घाटन
यवतमाळ, २४ जानेवारी (वार्ता.) – ग्रामीण तसेच शहरी भागात ० ते ६ वर्षे वयोगटातील काही बालकांमध्ये जन्मत: शारीरिक दोष, तसेच विविध आजार असतात. ते लवकर लक्षात येत नसल्यामुळे त्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटतो. जन्मत: दोष असणार्या बाळांवर उपचार करणार्या केंद्राचे उद्घाटन नुकतेच यवतमाळ येथे करण्यात आले.
अशा बालकांचे त्वरित रोगनिदान करून त्यांच्यावर जिल्हा अतीशीघ्र हस्तक्षेप केंद्राच्या माध्यमातून सर्वोत्तम उपचार करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे वने, भूकंप पुनर्वसन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी या वेळी केंद्राचे उद्घाटन करतांना केले. या केंद्रामुळे गरजू यांना त्वरित उपचार प्राप्त होतील. या उद्घाटन सोहळ्यात नगराध्यक्ष, जी.प. अध्यक्ष, जिल्हाधिकारी, जि.पो. अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आदी गणमान्य उपस्थित होते.