भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या ३ बँका सुरक्षित आहेत ! – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्यवहार आणि भविष्यातील गुंतवणूक यांसाठी कोणत्या बँका सुरक्षित आहे ना, याची माहिती दिली आहे. ‘भारतीय स्टेट बँक (SBI), आयसीआयसीआय बँक (ICICI) आणि एचडीएफसी बँक (HDFC) या ३ बँकांमध्ये तुमच्या ठेवी सुरक्षित आहेत’, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. आरबीआयने D-SIB (Domestic Systemically Important Banks) सूची प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे.
HDFC Bank, ICICI Bank and the SBI continue to be the bellwethers of the country’s banking system, with Mint Road Tuesday reiterating that all three lenders remain in the category designated as Domestic Systemically Important Bankshttps://t.co/RGKBdzWoQ8
— Economic Times (@EconomicTimes) January 20, 2021
डीएस्आयबी सूचीद्वारे घोषित केलेल्या बँका या विश्वासार्ह आहेत. वरील ३ बँकांमध्ये जर खाते असेल, तर पैशांची चिंता करण्याची आवश्यकता नाही.
आरबीआयने म्हटले आहे की, वरील ३ बँकांनी अनेकांना कर्ज दिले आहे. तरीही कोरोनासारख्या प्रतिकूल परिस्थितीत या बँकांवर कोणताही परिणाम झाला नाही.