वाढत्या तापमानामुळे समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होण्याच्या शक्यतेने जगातील २६० पेक्षा अधिक विमानतळ बुडण्याचा धोका !
समुद्राची पातळी वर्ष २००० च्या तुलनेत वर्ष २१०० मध्ये ८.२ फूट अधिक असू शकते !
जगातील तापमान वाढण्याला विज्ञान उत्तरदायी आहे, हे तथाकथित बुद्धीवादी, पुरो(अधो)गामी कधीही मान्य करणार नाहीत; मात्र तिच वस्तूस्थिती आहे !
नवी देहली – समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे जगभरातील शेकडो विमानतळांवरील उड्डाणे विस्कळीत होण्याचा धोका आहे, असे एका नव्या अभ्यासानुसार सांगण्यात आले आहे. तसेच समुद्राची पातळी वर्ष २०००च्या तुलनेत वर्ष २१०० मध्ये ८.२ फूट अधिक असू शकते, असेही यात सांगण्यात आले आहे.
More Than 260 Airports At Risk of Getting Submerged Due to Sea Level Rise, Coastal Flooding: Study https://t.co/kD2nDeJclu
(📸: John Moore/Getty Images) pic.twitter.com/DZebzZ8zvy
— The Weather Channel India (@weatherindia) January 23, 2021
१. हवामानाविषयी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार किनारपट्टीजवळ असणार्या जगातील २६०हून अधिक विमानतळांना पूर येण्याच्या शक्यतेमुळे धोका आहे आणि शतकाच्या अखेरीस १२ हून अधिक विमानतळ समुद्रसपाटीपासून खाली जाऊ शकतात.
२. आता आणि वर्ष २१०० या कालावधीत जगाच्या वाढत्या तापमानामुळे समुद्रपातळीच्या वाढीच्या प्रमाणानुसार आणखी शेकडो विमानतळ धोक्यात येऊ शकतात. आशिया आणि पॅसिफिक येथील विमानतळ यामध्ये वरच्या स्थानावर आहेत.
३. संशोधकांनी यांची क्रमवारी काढण्यासाठी अनेक वेगवेगळ्या घटकांचा विचार केला आहे. समुद्र पातळीपासून पूर, पूर संरक्षण आणि उड्डाणांवर परिणाम यांवरून त्यांना असे आढळले आहे की, विमान प्रवासाच्या एक पंचमांश भागापर्यंत याचा परिणाम होऊ शकतो.
४. समुद्रपातळी वाढीस समुद्रातील तापमानवाढ आणि उच्च वातावरणीय तापमान कारणीभूत आहे. ज्यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढते. हिमनदी आणि हिमनग वितळतात. ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनामुळे तापमानात अधिक वाढ होते. तीव्र हवामानाचा परिणामही त्रासदायक ठरू शकतोे आणि विनाशकारी वादळही संभवू शकतात.