कळंगुट येथे २ ठिकाणी अमली पदार्थ जप्त
पणजी, २४ जानेवारी (वार्ता.) – कळंगुट पोलिसांनी २४ जानेवारी या दिवशी २ ठिकाणी धाड घालून एकूण २ लाख २० सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले.
पहिल्या प्रकरणात खेड, रत्नागिरी येथील एका २१ वर्षीय युवकाकडून १ किलो २०० ग्रॅम (किंमत सुमारे १ लाख २० सहस्र रुपये) वजनाचे अमली पदार्थ, तर दुसर्या प्रकरणात पश्चिम बंगाल येथील १९ वर्षीय शब्बीर अली खान याच्याकडून १ लाख रुपये किमतीचा गांजा कह्यात घेण्यात आला आहे.