कोरोनाचे संकट असल्याने शिवजयंती उत्सव शांततेत साजरा करावा !
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
पुणे – राज्यातील, तसेच देशातील कोरोनाचे संकट अद्यापही संपूर्णपणे गेलेले नाही. या स्थितीत सण आणि उत्सव सुरक्षित वातावरणात अन् साधेपणाने साजरे करावेत. या वेळी शिवजयंती उत्सवही आपण शांततेत आणि सुरक्षिततेत काळजी घेऊन साजरा करावा,असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्किट हाऊसमध्ये शिवजयंती उत्सव आढावा बैठकीत केले. या वेळी सरकारी अधिकारी, खासदार आणि आमदार उपस्थित होते.