‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी घालण्यासाठी यावल (जिल्हा जळगाव) येथे निवेदन
जळगाव, २४ जानेवारी (वार्ता.) – देवतांचा अवमान करणार्या आणि जातीय द्वेष पसरवणार्या ‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी आणून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर समितीचे सर्वश्री धीरज भोळे, चेतन भोईटे, हेमंत बडगुजर, चंदू बडगुजर, शिवाजी बारी, धनराज कोळी, लखन नाथ यांच्या स्वाक्षर्या आहेत.