सातारा येथे अल्पवयीन मुलीवर मोकाट श्वानांचे आक्रमण
सातारा, २४ जानेवारी (वार्ता.) – येथील सदर बाजार परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर मोकाट फिरणार्या ५-६ श्वानांनी आक्रमण केले. या आक्रमणात मुलगी किरकोळ घायाळ झाली आहे. सातारा शहर आणि परिसरामध्ये मोकाट श्वानांची समस्या गंभीर होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी मोकाट श्वानांच्या आक्रमणामध्ये एका अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी अंत झाला होता. तरीही नगरपालिकेच्या वतीने मोकाट श्वानांना पकडण्यासाठी कोणतीही ठोस कृती केली जात नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक)