राजस्थानमध्ये चोरट्यांनी २ दिवसांत २ ठिकाणी एटीएम् यंत्र चोरून नेले !
राजस्थानमध्ये काँग्रेसचे राज्य असल्यामुळे तेथे चोरट्यांचे फावणारच !
अलवर (राजस्थान) – राज्यातील माहलडिया गावात ५ चोरट्यांनी एटीएम् यंत्रच उचलून चारचाकी गाडीत टाकून नेल्याची घटना घडली आहे. यात १२ लाख ७० सहस्र रुपयांची रक्कम ठेवण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाच्या आधारे चोरट्यांचा शोध चालू केला आहे. या घटनेच्या २ दिवसआधी अलवर जिल्ह्यातील मौजपूर गावातील एटीएम् यंत्र अशाच प्रकारे उचलून नेण्यात आले होते. त्यात १० लाख रुपये होते.