सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका मुख्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस अन् शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन !
सांगली, २३ जानेवारी – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका मुख्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष आणि नगरसेविका (सौ.) स्वाती शिंदे, नगरसेविका सौ. भारती दिगडे, प्रभाग क्रमांक १ च्या सभापती लक्ष्मी सरगर, श्री. पांडुरंग कोरे, साहाय्यक आयुक्त एस्.एस्. खरात, प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे, रवींद्र केसरे, सुनीता इनामदार यांच्यासह मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी सौ. स्वाती शिंदे म्हणाल्या, ‘‘महानगरपालिकेच्या सभागृहात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आम्ही सन्मानाने लावली, तसेच सांगलीतील ऐतिहासिक स्टेशन चौकाचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक असे नामकरण करण्यात पुढाकार घेतला. याच्या सुशोभिकरणाचे कामही चालू होत आहे.’’