ख्रिस्ती धर्मप्रचारक पॉल दिनाकरन् यांच्या ठिकाणांवर घातलेल्या धाडीत १२० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त !
आयकर विभागाने २८ ठिकाणांवर धाडी घातल्या !
|
चेन्नई (तमिळनाडू) – राज्यातील ख्रिस्ती धर्मप्रचारक पॉल दिनाकरन् यांचे निवासस्थान आणि कार्यालय मिळून २८ ठिकाणांवर आयकर विभागाने घातलेल्या धाडीतून १२० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यात साडेचार किलो वजनाच्या सोन्याचाही समावेश आहे. दिनाकरन् यांची इस्रायल, सिंगापूर, ब्रिटन, अमेरिका आदी १२ देशांमध्ये असलेली आस्थापने यांची २०० हून अधिक बँक खाती आढळली.
Tamil Nadu: Income Tax officials unearth unaccounted wealth of Rs 120 crore, 4.5kg gold during raids on Christian Evangelist Paul Dhinakaranhttps://t.co/NdnHURjMdx
— OpIndia.com (@OpIndia_com) January 24, 2021
‘जीजस कॉल्स’ ही पॉल दिनाकरन् यांच्याकडून चालवली जाणारी संस्था आहे, जी संपूर्ण तमिळनाडूमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार करते.