प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीतील त्यांच्या छायाचित्राला वर्षभरापूर्वी वाहिलेल्या फुलाचा टवटवीतपणा आणि एका संतांना आलेली सुगंधाची अनुभूती
प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीतील त्यांच्या छायाचित्राला वर्षभरापूर्वी वाहिलेले फूल अजूनही टवटवीत असणे आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांना फुलाचा वेगळाच सुगंध येणे
११.१२.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा श्री विष्णुतत्त्व जागृती सोहळा झाला. त्या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीतील त्यांच्या छायाचित्राला एक फूल वाहिले होते. त्या फुलातील चैतन्य मिळण्यासाठी दुसर्या दिवशी मी ते फूल स्वतःकडे ठेवले. नंतर ५ मासांनी मी पू. (सौ.) अश्विनी पवार यांना ते फूल दाखवले. त्या वेळी त्यांना त्या फुलाचा वेगळाच सुगंध आला. त्यांनी फुलाचे छायाचित्र काढून ठेवण्यास सांगितले. ते फूल अजूनही टवटवीत आहे.
– एक साधक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (नोव्हेंबर २०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |