नवीनच खरेदी केलेल्या चारचाकी वाहनात प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र ठेवल्यावर आलेल्या अनुभूती

नवीनच खरेदी केलेल्या चारचाकी वाहनात प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र ठेवल्यावर जोराचा पाऊस पडणे आणि बाहेर आल्यावर मार्गात अन्य ठिकाणी ऊन असल्याचे लक्षात येणे

प.पू. भक्तराज महाराज

३०.९.२०१९ या दिवशी नवीन चारचाकी वाहन (फोर्स चारचाकी वाहन) खरेदी करण्यासाठी आम्ही शोरूममध्ये गेलो होतो. चारचाकीत ठेवण्यासाठी रामनाथी आश्रमातून प.पू. भक्तराज महाराज यांचे (प.पू. बाबांचे) छायाचित्र दिले होते. चारचाकी खरेदी केल्यावर आम्ही चारचाकीत प्रथम प.पू. बाबांचे छायाचित्र ठेवले आणि त्यांना प्रार्थना केली, तुम्ही चारचाकीत बसावे.

आम्ही प्रार्थना केल्यावर शोरूमच्या परिसरात अनुमाने अर्ध्या किलोमीटर अंतरापर्यंत पाच मिनिटे जोराचा पाऊस पडला. त्या वेळी प.पू. बाबा चारचाकीत बसले आहेत, असे आम्हाला वाटले. आम्ही शोरूममधून बाहेर पडल्यानंतर पुढे येऊन पाहिल्यावर लक्षात आले, मार्गात अन्य कुठेही पाऊस पडला नाही. सगळीकडे कडकडीत ऊन आहे.

– एक साधक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (नोव्हेंबर २०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक