देशद्रोहाचा गुन्हा असलेली रिव्हॉल्युशनरी गोवन्स विधानसभेच्या सर्व जागा लढवणार
पणजी – अशासकीय संस्था आणि देशद्रोहाचा ठपका असलेल्या रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे चालू मासाच्या अखेरीस राजकीय पक्षात रूपांतर होणार आहे, अशी घोषणा रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे मनोज परब यांनी केली. रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या पणजी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मनोज परब बोलत होते. मनोज परब पुढे म्हणाले, विधानसभेत पर्सन्स ऑफ गोवन् ओरिजीन हे विधेयक संमत करणे आणि गोमंतकियांचे अधिकार अबाधित ठेवणे, हे पक्षाचे प्रमुख ध्येय राहील. रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या वरिष्ठ पदाधिकार्यांचे सध्या गुन्हे अन्वेषण विभाग देशद्रोहाच्या प्रकरणावरून अन्वेषण करत आहे.