केंद्रीय कृषी कायद्यांविषयी काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष अपप्रचार करत आहेत ! – राजकुमार चहर, अध्यक्ष, किसान मोर्चा, भाजप
पणजी, २३ जानेवारी (वार्ता.) – केंद्रीय कृषी कायद्यांविषयी काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष अपप्रचार करत आहेत. काँग्रेस पक्षाने या कृषी कायद्याविषयी पंजाबमधील काही शेतकर्यांची दिशाभूल केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळत असलेली लोकप्रियता त्यांना पहावत नाही, असा आरोप सध्या गोवा दौर्यावर असलेले भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष राजकुमार चहर यांनी केला आहे.
राजकुमार चहर पुढे म्हणाले, कृषी कायद्यामुळे गोव्यासह सर्व देशाला लाभ मिळणार असल्याचे आगामी काळात सिद्ध होणार आहे.