मडगाव येथून २ अल्पवयीन मुलींचे अपहरण : पोलीस संशयित धर्मांधाच्या शोधात
अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत आघाडीवर असलेले धर्मांध !
मडगाव, २३ जानेवारी (वार्ता.) – चंद्रावाडो, फातोर्डा येथून १६ वर्षीय २ मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. या प्रकरणी मडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पोलीस सध्या संशयित आरोपी मौलवी अब्दुल देवगिरी याच्या शोधात आहेत. (याविषयी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला काय म्हणायचे आहे ? अशा गोष्टींचा ते चुकूनही निषेध करत नाहीत. यावरून त्यांना हे मान्य आहे, असे वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)
प्राप्त माहितीनुसार नावेली येथील एका युवकाने मडगाव पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार २० जानेवारी २०२१ या दिवशी सकाळी ८.४५ वाजता त्याची बहीण घरातून बाहेर गेली होती. तिच्यासमवेत १६ वर्षांची आणखी एक मुलगीही होती. या दोघींचेही अपहरण करण्यात आले. या अपहरण प्रकरणाचे उपनिरीक्षक स्टेन्ली गोम्स अन्वेषण करत आहेत. संशयित आरोपीच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम ३६३ आणि गोवा बाल कायदा-२००३चे ८ वे कलम यांखाली गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. अपहरणाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास आरोपीला कमाल ७ वर्षांची कैद आणि दंड अशा शिक्षेची कायद्यात तरतूद आहे.