वास्को येथे १० वी इयत्तेतील २ विद्यार्थी कोरोनाबाधित
विद्यालयाचे नियमित वर्ग बंद
वास्को, २३ जानेवारी (वार्ता.) – येथील एका विद्यालयातील २ विद्यार्थी कोरोनाबाधित झाले आहेत. हे दोन्ही विद्यार्थी एकाच वर्गात शिकत होते. यामुळे विद्यालयाचे नियमित वर्ग पुढील काही दिवसांसाठी रहित करण्यात आले आहेत.
तिसर्या दिवशी १२८ आरोग्य कर्मचार्यांचे लसीकरण
राज्यात कोरोना लसीकरणाच्या तिसर्या दिवशी १२८ आरोग्य कर्मचार्यांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली. दिवसभरात कोरोनामुळे ३ जणांचा मुत्यू झाला आहे, तर ८५ जण कोरोनाबाधित झाले आहेत.