उबेर मोटो या दुचाकी टॅक्सी अॅपवर वाहतूक खाते कारवाई करणार
पणजी, २३ जानेवारी (वार्ता.) – राज्यात उबेर मोटो हे दुचाकी टॅक्सी अॅप अनधिकृतपणे कार्यरत असल्याची माहिती वाहतूक खात्याला मिळाली आहे. वाहतूक खात्याने डमी ग्राहकाच्या माध्यमातून उबेर मोटोवर कार्यरत असलेल्या दुचाकीचालकाचे संभाषण ध्वनीमुद्रित केले आहे. राज्यशासनाने उबेर मोटो या दुचाकी टॅक्सी अॅपला अजूनही अनुमती दिलेली नाही. उबेर मोटोवर कारवाई करण्याच्या दृष्टीने वाहतूक खाते प्रयत्नशील आहे.