शिबिरातील एका सत्रात स्वभावदोषाविषयी मनमोकळेपणाने बोलल्याने एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिकेला स्वतःत जाणवलेले पालट
शिबिरातील स्वभावदोष आणि अहं निर्मूलन या सत्रात प्रतिमा जपणे या स्वभावदोषाविषयी मनमोकळेपणाने बोलल्याने एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की यांना स्वतःत जाणवलेले पालट
१. शिबिरातील सत्रात सद्गुरु सिरियाक वाले यांच्याकडून साधकांवर चैतन्याचा वर्षाव होत असून हे चैतन्य परात्पर गुरु डॉक्टरांकडूनच येत आहे, असे जाणवणे
एका शिबिरातील स्वभावदोष आणि अहं निर्मूलन या सत्रात सद्गुरु सिरियाक वाले, पू. रेन्डी इकारांतियो आणि श्री. गियोम ऑलिव्हिए साधकांना मार्गदर्शन करत होते. त्या वेळी साधक मनमोकळेपणाने स्वतःमधील प्रतिमा जपणे, कौतुकाची अपेक्षा करणे आणि दिखाऊपणा हे स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांविषयी स्वतःचे चिंतन सांगत होते. साधकांचे चिंतन मार्गदर्शक साधक अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने ऐकत होते. त्यामुळे मीही त्या चर्चेत माझे विचार व्यक्त करू शकले. मी माझ्या साधनेतील अडचणी मनमोकळेपणाने मांडू शकले आणि त्यामुळे त्या संदर्भातील योग्य दृष्टीकोन काय असायला हवा ? हे मला शिकायला मिळाले. या सत्रात मुख्यतः मला वाटणारी भीती म्हणजे माझ्या भ्रामक कल्पना आहेत, याची मला जाणीव झाली. माझ्या मनातील शंकांचे संपूर्ण समाधान झाल्याने मला पुष्कळ आनंद झाला. या सत्रानंतर शिबिरातील सर्वच साधकांना आतून शांत आणि हलके वाटत होते. या चर्चासत्राच्या वेळी सद्गुरु सिरियाकदादा यांच्याकडून आम्हा साधकांवर चैतन्याचा वर्षाव होत आहे. परात्पर गुरु डॉक्टरांकडूनच हे चैतन्य येत असून ते माझ्या अंतर्मनापर्यंत पोचत आहे, असे मला जाणवले.
२. स्वभावदोष न्यून करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे तीव्रतेने वाटून स्वतःतील स्वभावदोषांविषयी जागरूकता वाढणे
या सत्रानंतर माझ्यातील प्रतिमा जपणे हा अहंचा पैलू न्यून करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मला तीव्रतेने वाटू लागले. शिबिराच्या पुढील सत्रांत ज्या ज्या वेळी मला मनातील विचार मनमोकळेपणाने बोलण्यात संकोच वाटे, त्या त्या वेळी मला वरील सूत्रांची आठवण होऊन मी मोकळेपणाने बोलत असे. प्रतिमा जपणे या अहंच्या पैलूविषयी माझी जागरूकता वाढली होती. माझ्या मनातील अयोग्य विचार आणि त्यावरील योग्य दृष्टीकोन मी लिहून काढू लागले. त्यामुळे भीती वाटणे आणि न्यूनगंड या स्वभावदोषांविषयी मला बरेच शिकायला मिळाले. आता माझ्या प्रतिदिन १० ते १५ चुका लक्षात येतात. पूर्वी असे कधीच होत नव्हते. परात्पर गुरु डॉक्टरांकडून शिबिरात येणार्या चैतन्यामुळेच मला वरील प्रयत्न करणे शक्य झाले. मार्गदर्शक साधकांनी सांगितलेली सूत्रे तत्परतेने कृतीत आणल्यास आपल्याला ईश्वराची कृपा अधिक प्रमाणात मिळते. सवलत न घेता आपण कृतीप्रवण होतो, असे माझ्या लक्षात आले.
आमचे स्वभावदोष निर्मूलनाचे प्रयत्न आनंददायी व्हावेत, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांकडून चैतन्याचा वर्षाव आम्हा सर्वांवर सातत्याने होत आहे. त्यासाठी मी गुरुचरणी कृतज्ञ आहे.
– गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की, ऑस्ट्रिया (५.१.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |