अध्यात्मप्रसारासाठी घेतलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या नवीन वाहनाच्या पूजेच्या वेळी आणि वाहनातून प्रवास करतांना आलेल्या अनुभूती
अध्यात्मप्रसारासाठी वापरण्यात येणार्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या नवीन वाहनाच्या पूजेच्या वेळी आणि वाहनातून प्रवास करतांना संत अन् साधक यांना आलेल्या अनुभूती
१९.५.२०२० या दिवशी जर्मनीमधील फ्रॅन्कफर्टजवळ असलेल्या लम्पाताइम या शहरात एस्.एस्.आर्.एफ्.च्या नवीन वाहनाची (कॅराव्हॅन निवासाच्या सुविधा असलेले वाहन) पूजा करण्यात आली. अध्यात्मप्रसारासाठी वापरण्यात येणार्या या गाडीच्या पूजेच्या वेळी सद्गुरु सिरियाक वाले आणि साधक श्री. स्टेफान, श्री. गियोम अन् कु. स्कार्लेट उपस्थित होते.
१. पूजेच्या वेळी संत आणि साधक यांना आलेल्या अनुभूती
१ अ. सद्गुरु सिरियाक वाले : वाहनाला तुपाच्या दिव्याने ओवाळत असतांना मनात उत्स्फूर्तपणे प्रार्थना झाली, या वाहनाच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्ञान आणि ख्याती संपूर्ण युरोपमध्ये पसरू दे. – (सद्गुरु) सिरियाक वाले
१ आ. कु. स्कार्लेट
१. वाहनाची पूजा चालू असतांना मला वाहनात श्रीविष्णूचे अस्तित्व जाणवले. हे वाहन त्याचेच असून त्याची अध्यात्मप्रसाराची समष्टी सेवा घडावी, यासाठी त्यानेच ते वाहन आम्हाला दिले आहे. त्यानिमित्ताने परात्पर गुरु डॉक्टरांचे ज्ञान आणि चैतन्य पसरवण्याची, तसेच साधकांना भेटण्याची संधी देत असल्याविषयी मला त्या वाहनाप्रती कृतज्ञता वाटली.
२. पूजा झाल्यानंतर त्याचे साहित्य आणि निर्माल्य र्हाइन नदीत विसर्जन करतांना नदीचे पाणी आमच्या दिशेने वाहू लागले, जणूकाही ते अर्पण घेण्यासाठी नदी आतुर झाली आहे.
२. वाहनातून प्रवास करतांना साधकांना आलेल्या अनुभूती
२ अ. श्री. गियोम : वाहनातून प्रवास करतांना इतर वाहनांच्या तुलनेत या वाहनात नामजप आणि स्वयंसूचना सत्रे विनासायास होतात, तसेच सेवाही सहजपणे घडते.
२ आ. कु. स्कार्लेट : सद्गुरु सिरियाक वाले साधकांना मार्गदर्शन करत असतांना क्षणभर मला त्यांच्या जागी परात्पर गुरु डॉक्टर दिसले. त्यामुळे प्रत्यक्षात परात्पर गुरु डॉक्टरच मार्गदर्शन करत आहेत, असे मला जाणवले.
२ इ. श्री. स्टेफान : वाहनामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले, प.पू. भक्तराज महाराज आणि श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आहेत. साधक जेव्हा वाहन पहात होते, तेव्हा साधकांना त्यांचे अस्तित्व जाणवले. हे वाहन म्हणजे अध्यात्मप्रसार करणारा आणि साधकांना चैतन्य प्रदान करणारा चालता-फिरता आश्रमच आहे, असे मला जाणवले. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला साधनेत आणून एक प्रकारे भेटच दिली आहे, असे एका साधकाने सांगितल्यावर सर्वांची भावजागृती झाली.
– (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप (१५.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संत आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |