पोलीसदलाचे सध्याचे ब्रीदवाक्य सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश पोलीस सार्थकी लावतात का ?
संतांना लाथ आणि दुर्जनांना हात, अशी पोलीसदलाची स्थिती !
|
भारतामध्ये महाराष्ट्र पोलीसदल तिसर्या क्रमांकाचे सर्वांत मोठे पोलीसदल असलेले राज्य आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय (सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश) हे महाराष्ट्र पोलीसदलाचे ब्रीदवाक्य आहे; परंतु या ब्रीदवाक्याप्रमाणे महाराष्ट्रात सज्जनांचे रक्षण होते का ? मागील भूतकाळातील घटनांचा मागोवा घेतला असता असे लक्षात येते की, संतांना लाथ आणि दुर्जनांना हात, अशी पोलीसदलाची स्थिती आहे. पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यास गेलेल्या सर्वसामान्य नागरिकाला काय त्रास होतो, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळेच पोलीस ठाण्याची आणि न्यायालयाची पायरी कधी चढू नये, असा सर्वसामान्य माणसाचा समज झालेला आहे. मग पोलीसदलाचे ब्रीदवाक्य ते सार्थकी लावतात का ?, हा विचार करायला हवा.
पोलीसदलात बरीच वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेल्या एका पोलीस अधिकार्याने पोलीसदलाविषयी जे काही अनुभवले, ते त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण पोलिसांना देण्यात येणारे प्रशिक्षण, त्यामध्ये होणारा भ्रष्टाचार; पोलीस मुख्यालयात कामांच्या वाटपामध्ये होणारा भ्रष्टाचार; पोलीस कल्याण विभागामध्ये होणारा भ्रष्टाचार; कार्यालय मदतनीस आणि घरच्या कामांच्या संदर्भातील (हाऊस) मदतनीस यांच्या नेमणुकीमध्ये होणारा भ्रष्टाचार आदी माहिती वाचली.
सुराज्य स्थापनेचे एक अंग : आदर्श पोलीसपोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे सिनेमांमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत. – संपादक |
१०. धर्मांध पोलीस अधिकार्याने हिंदूंना वेचून ठार मारणे !
वर्ष १९९२-९३ च्या दंगलीमध्ये एका शहरातील धर्मांध पोलीस अधिकार्याने हिंदु व्यक्तींना वेचून वेचून गोळ्या घातल्या होत्या, असे मी ऐकले होते.
११. पोलीस अधिकार्यांचे अमली पदार्थ माफियांशी असलेले संबंध !
वर्ष १९९० च्या दशकात एक आय.पी.एस्. अधिकारी मुंबई पोलिसांचे अमली पदार्थविरोधी विभागाचे प्रमुख असतांना त्यांनी त्यामध्ये पुष्कळ मोठा भ्रष्टाचार केला. गुन्ह्यात जप्त केलेला काही मूळ माल त्यांनी अमली पदार्थ माफियांना विकला आणि त्यामध्ये त्यांनी खोटी (डुप्लीकेट) पावडर टाकली. अशा प्रकारे ते पुष्कळ माया जमवून विदेशात पळून गेले आणि तिकडेच स्थायिक झाले आहेत. अमली पदार्थ माफियांशी त्यांचे जवळचे संबंध होते.
१२. पोलीसदलातील फितूर पोलीस !
पूर्वी पोलीस ठाण्याला पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपायुक्त यांची भेट (व्हिजिट) असायची. त्या वेळी ते स्थानिक अधिकार्यांना, अमुक मटकावाले, अमुक बारवाले आणि दारूवाले यांच्यावर धाड टाकण्याची सिद्धता करा, असे सांगायचे. तेव्हा धाड टाकण्याची बातमी सर्वांत आधी धंदेवाल्यांना जायची. असे केल्याने तो धंदेवाईक सर्व गिर्हाईक पळवून लावत असे आणि पोलिसांच्या हाताला काहीच लागत नसे. खात्यामध्ये काही प्रामाणिक अधिकारीही आहेत, जे स्वतः पोलिसांना घेऊन गुप्तपणे छापा घालत; मात्र काही पोलीस ठाण्यांमध्ये असे काही फितूर, देशद्रोही, बातमी (लिक करणारे) फोडणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. असे पोलीस पोलीस खात्याला कलंकित करतात.
१३. कामांचे चांगले मूल्यांकन मिळावे, यासाठी पोलीस अधिकार्यांना खुश करण्यासाठी निरपराध जनतेचा छळ करणारे पोलीस !
पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदारांंच्या वार्षिक (मूल्यांकन) सेवा पुस्तकाची पडताळणी केली जाते. त्या वेळी त्याने वर्षभरात काय काम केले याचे मूल्यांकन करून शेरा दिला जातो. पोलीस शिपायांच्या सेवापुस्तकाची पडताळणी ही साहाय्यक पोलीस आयुक्तांकडे, तर पोलीस हवालदारांची (३ फित) पोलीस उपायुक्त (संबंधित परिमंडळ) यांच्याकडे असते. त्या वेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी हे त्यांच्या कामाचा गोषवारा बघतात. दारूच्या प्रकरणातील किती गुन्हे नोंदवले?, शस्त्रधारी किती लोकांना पकडले ?, किती गुन्हे उघडकीस आणले ?, गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक का केली नाही ?, पाहिजे असलेले आरोपी का पकडले जात नाहीत ?, आदी प्रश्न वरिष्ठ अधिकार्यांकडून विचारले जाऊन त्याच्या पूर्ततेचा आदेश दिला जातो. या आदेशाच्या पूर्ततेसाठी हे अंमलदार एखाद्या निरपराध्याच्या खिशात चाकू ठेव, एखाद्याच्या शर्टात ब्राऊन शुगर ठेव, अशा कृती करून खोट्या तक्रारी प्रविष्ट करतात. त्यामुळे असे निरपराध लोक याला बळी पडतात आणि नंतर कारागृहात जाऊन तेथे गुन्हेगारांच्या संगतीमध्ये स्वतःची इच्छा नसतांनाही गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात. अशा प्रकारे पोलिसांकडून अधर्म आणि पाप केले जाते अन् लोकांची पिळवणूक होते.
१४. राजकारण्यांच्या दबावामुळे पोलिसांकडून द्वेषभावनेतून निरपराध्यांना अटक केली जाणे
पोलीस ठाण्यातील काही अधिकारी राजकारण्यांच्या दबावामुळे किंवा वरिष्ठांच्या दबावामुळे एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी सापडला नाही, तर काहीही न केलेल्या व्यक्तींना द्वेषभावनेतून/आकसातून संशयित आरोपी म्हणून अटक करतात. एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी सापडले नाहीत, तर पोलीस ठाण्यातील अधिकारी त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना पोलीस ठाण्याच्या भेटीच्या वेळी संशयित इसमांना पकडून संशयित आरोपी पकडले, असे दाखवतात. नंतर ते आरोपी न्यायालयाकडून निर्दोष सोडले जातात.
१५. आरोपींकडून लाच स्वीकारणारे पोलीस !
१५ अ. गुन्हेगारीतील सहभाग अल्प दाखवण्यासाठी आणि अटक होऊ नये, यासाठी आरोपींकडे लाच मागणे : पोलीस ठाण्याच्या अंतर्गत डिटेक्शन स्टाफ (गुन्हे प्रकटीकरण कक्ष) असतो. पोलीस ठाणे हद्दीतील गंभीर दखलपात्र गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्यांना आळा बसावा; म्हणून पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करणे आदी कृती करतात. या स्टाफला गुन्ह्याची माहिती खबर्याकडून मिळत असते. हा खबर्या पोलीस ठाणे हद्दीत कुठे काय चालते, याची माहिती या डिटेक्शन स्टाफला देत असतो. त्याने दिलेली माहिती खरी ठरली, तर पोलीस त्याला ठरल्याप्रमाणे पैसे देतात. या स्टाफला एक पोलीस उपनिरीक्षक किंवा साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी प्रमुख असतो. एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपीचा सहभाग अल्प दाखवणे किंवा संबंधिताला गुन्ह्यात अटक होऊ नये, यासाठी लाच मागतात. त्यामध्ये त्या पोलीस ठाण्याच्या इन्चार्ज अधिकार्यालाही पैसे दिले जातात.
१५ आ. गंभीर गुन्ह्यांच्या वेळी व्यावसायिक पंच वापरले जाणे आणि त्यामुळे न्यायालयात दोषसिद्धतेचे प्रमाण अल्प होणे : एखाद्या गंभीर गुन्ह्यात व्यावसायिक पंच (पोलिसांनी ठरवलेले पंच. हे पैसे घेऊन काम करतात.) त्याला स्टॉक पंच असे नाव आहे.स्टॉक पंच म्हणजे साठ्यातील पंच किंवा पोलीस ठाण्याच्या बाहेर चहाच्या टपरीवर काम करणारे इसम पंच म्हणून घेतात. घटनास्थळी पंचनामा न करता पोलीस ठाण्यामध्ये बसून पंचनामा केला जातो. त्यामुळे गुन्हा न्यायालयात सिद्ध होण्याचे प्रमाण अल्प होते. गुन्ह्याचे अन्वेषण करतांना योग्य ते पुरावे न्यायालयात सादर केले जात नाहीत. दोषारोपपत्र जाणून बुजून विलंबाने प्रविष्ट केले जाते. त्यामुळे आरोपी पैशांच्या बळावर जामिनावर सुटतात.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– एक निवृत्त पोलीस
पोलीस आणि प्रशासन यांच्या संदर्भात येणारे कटू अनुभव कळवा !
साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !
सोबतच्या लेखात दिल्याप्रमाणे अथवा पोलीस-प्रशासन यांतील कर्मचारी किंवा अधिकारी यांच्याविषयी कटू अनुभव आले असल्यास ते पुढे दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. या लेखाचे प्रयोजन पोलीस आणि प्रशासन कसे नसावे हे ध्यानात यावे, संबंधित कर्मचारी/अधिकारी यांना त्यांच्या अयोग्य कृत्यांची जाणीव होऊन त्यांनी त्यात सुधारणा करावी आणि नागरिकांनी आपले राष्ट्रकर्तव्य म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ते सुधारण्यास प्रयत्न करावेत, वेळप्रसंगी या विरोधात तक्रारी द्याव्यात, हे आहे.
पत्ता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर
द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.
संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४
ई-मेल : socialchange.n@gmail.com