१००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या क्रमांकाच्या नोटा चलनातून बाद करण्यावर रिझर्व्ह बँकेचा विचार !

नवी देहली – मार्च किंवा एप्रिल २०२१ पर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आर्.बी.आय.) १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या क्रमांकाच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत आहे, असे आर्.बी.आय.चे साहाय्यक महाव्यवस्थापक बी. महेश यांनी सांगितले. जिल्हास्तरीय सुरक्षा समिती आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

बी महेश म्हणाले की, १० रुपयांचे नाणे आणून १५ वर्षे झाल्यानंतरही व्यापारी आणि उद्योजक यांनी त्याचा स्वीकार न करणे बँका आणि आर्.बी.आय. यांच्यासाठी मोठी समस्या झाली आहे. १० रुपयांची नाणी बँकांसाठी मोठे ओझे झाले आहे. लोकांनी १० रुपयांचे नाणे अधिकाधिक वापरावे, यासाठी बँकांनी मार्ग शोधण्याची आवश्यकता आहे.