अंमलबजावणी संचालनालयाची हितेंद्र ठाकूर यांच्या विवा समुहाच्या ६ ठिकाणांवर धाडी
पी.एम्.सी. अधिकोष घोटाळा प्रकरण
मुंबई – पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील पैशांच्या देवाण-घेवाण (मनी लॉन्ड्रिंग) प्रकरणात अन्वेषण करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने २२ जानेवारी या दिवशी मीरा-भाईंदर, वसई-विरार परीसरांत धाडी घातल्या. या वेळी विवा समुहाचे मालक आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि जयेंद्र उर्फ भाई ठाकूर यांच्या ६ ठिकाणांवर धाडी घालण्यात आल्या. या प्रकरणात अटक झालेला प्रमुख आरोपी प्रवीण राऊत आणि ठाकूर कुटुंब यांच्यात पैशांची देवाण-घेवाण झाल्याचे पुरावे मिळाल्याचे समजते. भाई ठाकूर यांचा प्रभाव वसई-विरार या क्षेत्रात आहे. वसई-विरार महापालिकेवरही भाई ठाकूर यांचे भाऊ हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास अघाडीची सत्ता आहे.