हिंदु नाव धारण करून हिंदु विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करणार्या धर्मांधाला अटक
प्रेम करण्यासाठी धर्म का लपवावा लागतो, हे निधर्मीवादी सांगतील का ?
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथे मॅकेनिकचे काम करणार्या असद खान या ३० वर्षीय मुसलमान तरुणाने ‘आशू’ असे हिंदु नाव धारण करून एका अभियांत्रिकी शिक्षण घेणार्या हिंदु विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि विवाहाचे आमीष दाखवून २ वर्षे तिचे लैंगिक शोषण केले. तरुणीने एकदा त्याला नमाजपठण करतांना पाहिल्यावर तो हिंदू नसल्याचे उघड झाले. त्यानंतर त्याने तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यास दबाव आणला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर असद याला अटक करण्यात आली.