तमिळनाडूमध्ये प्राचीन मंदिरांच्या भिंतींवर क्रॉस रेखाटून त्याला चर्चचे स्वरूप देण्याचा प्रयत्न !
|
तिरुपत्तूर (तमिळनाडू) – येथील नटरमपल्ली तालुक्यातील एलापल्ली गावामध्ये हिंदूंच्या २५० वर्षे प्राचीन असणार्या अम्मान मंदिराच्या सर्व भिंतींवर आणि फरशांवर ख्रिस्त्यांचा क्रॉस रेखाटण्यात येऊन त्याला चर्चचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
तमिलनाडु में हिन्दूद्वेषी @AIADMKOfficial की सरकार के राज में हिन्दुओं के मंदिर असुरक्षित !
अम्मान मंदिर की दीवारों पर क्रॉस पेंट कर चर्च में बदलने का हो रहा है प्रयास‘सहिष्णुतावादि’यों को क्या ईसाईयों की यह ‘असहिष्णुता’ नहीं दिखती ? pic.twitter.com/xIW2khysQF
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) January 22, 2021
गावकर्यांचा आरोप आहे की, महेंद्रन् आणि बेबी यांचा मुलगा बासकर याने यापूर्वी या मंदिरातील मूर्ती आणि दानपेटी तोडली होती. याची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती. (तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी काय कृती केली. त्याच वेळी कारवाई झाली असती, तर धर्मांध भविष्यात हिंदुविरोधी कृत्य करण्यास धजावले नसते ! – संपादक) त्यानेच मंदिरावर क्रॉस रेखाटल्याचा संशय गावकर्यांनी वर्तवला आहे. याविषयी बासकर याच्याकडे गावकर्यांनी विचारणा केल्यावर त्याने शिवीगाळ केली. तसेच त्याने धमकी दिली, ‘माझ्यासमवेत गावातील काही जण असून आम्ही मिळून हे कृत्य केले आहे. त्यामुळे माझे कुणीच काही वाईट करू शकणार नाही.’ (धर्मांधांचा उद्दामपणा ! अशांना कठोर कारवाई केली, तरच ते ताळ्यावर येतील ! – संपादक)