यवतमाळ येथे वेब मालिका ‘तांडव’वर बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी शासनाला निवेदन
यवतमाळ, २१ जानेवारी (वार्ता. ) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय माहिती अन् प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांना जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यामार्फत हिंदु देवतांचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या आणि जातीद्वेष पसरवणार्या ‘तांडव’ वेब मालिकेवर बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन २० जानेवारी या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. या वेळी समितीचे सर्वश्री दत्तात्रेय फोकमारे, राम धारणे आणि सूर्यकांत पाली उपस्थित होते.