नाशिक महापालिकेजवळ लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त
नाशिक – महापालिकेच्या शिवसेना गटनेता कार्यालयाजवळ लागलेली आग आटोक्यात आली आहे. पेस्ट कंट्रोल चालू असतांना शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. माहिती मिळताच अग्नीशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येत आग वेळीच आटोक्यात आणली. या वेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी घटनास्थळाला भेट दिली.
या आगीची चौकशी करण्यात येईल त्यासाठी आयुक्तांनी चौकशी समितीही नियुक्त केली आहे आणि नगरपालिकांच्या इमारतींचे ‘फायर ऑडिट’ झाले आहे किंवा नाही यासंदर्भात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे उदय सामंत यांनी या वेळी सांगितले.