खडतर प्रारब्ध भोगत सकारात्मक राहून श्रद्धेच्या बळावर जीवन जगणार्या बेळगाव येथील श्रीमती सुमंगला मट्टीकल्ली यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
बेळगाव (कर्नाटक) – अत्यंत खडतर जीवन जगतांना त्याला धीराने आणि सतत हसतमुखाने तोंड देऊन जीवन जगणार्या येथील श्रीमती सुमंगला मट्टीकल्ली (वय ७० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे १७ जानेवारी या दिवशी घोषित करण्यात आले. ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रमात धर्मप्रचारक श्री. काशिनाथ प्रभु यांनी ही घोषणा केली. श्रीमती सुमंगला मट्टीकल्ली या सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्या साधिका सौ. विजयालक्ष्मी आमाती यांच्या नणंद आहेत. बेळगाव येथील सनातनच्या साधिका सौ. शुभांगी कांग्रेलकर यांनी श्रीमती सुमंगला मट्टीकल्ली यांना खाऊ दिला.
या वेळी त्यांच्या सुना सौ. दीपा मट्टीकल्ली, श्रीमती वैशाली आणि सौ. द्राक्षायनी, मुलगी सौ. भारती कमतगी, सनातनचे साधक श्री. प्रसाद हळदणकर आणि हृषिकेश गुर्जर उपस्थित होते. या वेळी श्रीमती सुमंगला मट्टीकल्ली यांचे नातेवाईक सौ. विजयालक्ष्मी आमाती (भावजय), कु. कीर्ती आमाती (भाची), सौ. आरती पुराणिक (भाची) आणि श्री. भानू पुराणिक (भाचीचे यजमान) हे संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून जोडले होते. या वेळी श्रीमती सुमंगला मट्टीकल्ली यांच्या सर्व सुनांनी त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगून ‘त्यांच्याकडून पुष्कळ शिकण्यासारखे आहे’, असे सांगितले.
माझी काहीच क्षमता नसतांना सर्व देवानेच घडवून आणले ! – श्रीमती सुमंगला मट्टीकल्ली
सत्कार झाल्यावर मनोगत व्यक्त करतांना श्रीमती सुमंगला मट्टीकल्ली म्हणाल्या, ‘‘माझी काहीच क्षमता नसतांना हे सर्व देवानेच घडवून आणले. मी तर सत्कार होण्यासारखे काहीच केले नाही. जे काही झाले, ते देवाच्याच कृपेने झाले. देवानेच शक्ती दिली म्हणून हे सर्व झाले.’’
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |