व्यापक विरोधानंतर कर्नाटकातील भाजप सरकारकडून ‘राममंदिर का नको ?’, या पुस्तकांची खरेदी रहित !
शासकीय ग्रंथालयांत होणार होती खरेदी !
मुळात अशा पुस्तकाची खरेदी करण्याचा निर्णय घेतलाच कसा ?, हाच प्रश्न आहे !
बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील ग्रंथालयांसाठी के.एस्. भगवान यांचे ‘राममंदिर का नको ?’, ही पुस्तके खरेदी करण्याचा प्रयत्न करणार्या शासनाला व्यापक स्तरावर विरोध झाल्याने शासनाने हे पुस्तक खरेदी करण्याचा निर्णय रहित केला आहे.
Bhagavan, a rationalist, said the government cannot hold public libraries hostage to one ideology.https://t.co/zHLsWbpvGn
— The Indian Express (@IndianExpress) January 20, 2021
याविषयी राज्याचे शिक्षण सचिव सरेश कुमार यांनी ‘कोणत्याही पद्धतीने लोकांच्या धार्मिक भावनांना धक्का पोचवणार्या पुस्तकांची खरेदी शिक्षण विभाग करणार नाही. अशा कोणत्याही उपक्रमाला मी प्रोत्साहन देणार नाही’, असे स्पष्ट केले. एकीकडे सत्ताधारी पक्ष श्रीराममंदिर निर्माणासाठी देशभर निधी संकलनाचे अभियान चालवत असतांना दुसरीकडे श्रीरामाच्या संदर्भात विवादास्पद सूत्रे असलेले पुस्तक सरकारनेच खरेदी करून त्याची प्रत प्रत्येक ग्रंथालयांत ठेवण्याच्या प्रक्रियेने शेवटचा टप्पा गाठला होता. यामुळे भाजपमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या पुस्तकात ‘मनुष्याला मंदिर कशाला हवे ?’ अशा आशयाचे लिखाण आहे.