सातारा येथे प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण !
सातारा – २६ जानेवारी या दिवशी छत्रपती शाहू स्टेडियममध्ये राष्ट्रध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहण होईल. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमासाठी केवळ निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.