सातारा येथील ऐतिहासिक चार भिंत परिसरात मद्यपींचा वावर !
ऐतिहासिक ठेव्याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची ‘धर्मवीर युवा मंच’ची मागणी
जे सर्वसामान्य शिवभक्तांना दिसते ते पोलिसांना का दिसत नाही ? अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून लक्ष का देत नाहीत ?
सातारा – सातारा शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. किल्ले अजिंक्यतारा, चार भिंत परिसरात काही विघ्नसंतोषी मंडळी चुकीचे कार्य करतांना शिवभक्तांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे सातारा शहरातील या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवून मद्यपींना धडा शिकवावा, अशी मागणी ‘धर्मवीर युवा मंच’ने सातारा पोलिसांकडे केली आहे.
…..तर मद्यपींना वचक बसण्यासाठी हातात दांडकी घेणार ! सातारा शहर पोलिसांना दोघेजण मद्यपान करत असतांना कळवले होते; मात्र पोलीस विलंबाने घटनास्थळी पोचले. तोपर्यंत मद्यपी तेथून पसार झाले होते. शहर पोलिसांना कळवूनही ते काहीही करणार नसतील, तर यापुढे ‘ऐतिहासिक ठेवा जतन करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे’ यासाठी मद्यपींना वचक बसण्यासाठी प्रसंगी हातात दांडकी घ्यावी लागतील, अशी चेतावणी ‘धर्मवीर युवा मंच’ने दिली आहे. |