‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करावी !
नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीची जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
नंदुरबार – ‘अॅमेझॉन प्राईम’वर अली जफर दिग्दर्शित प्रसारित झालेली ‘तांडव’ या वेब मालिकेमध्ये हिंदु देवतांचा अवमान करून धर्मभावना दुखावून जातीय द्वेष पसरवण्यात आला आहे. त्यामुळे या वेब मालिकेवर तात्काळ बंदी आणावी, तसेच यातील दोषी कलाकारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना २० जानेवारी या दिवशी दिलेल्या निवेदनाद्वारे केली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सतीश बागुल, राहुल मराठे, धर्मप्रेमी सर्वश्री आकाश गावित, व्यंकटेश शर्मा, अमोल ठाकरे उपस्थित होते.