अभिनेता सोनू सूद यांची मुंबई महापालिकेविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

सोनू सूद

मुंबई – अभिनेता सोनू सूद यांची मुंबई महापालिकेविरोधातील याचिका न्यायालयाने २१ जानेवारी या दिवशी फेटाळली आहे. महापालिकेने सोनू सूद यांच्या विरोधात जी कारवाई केली आहे, ती योग्यच आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सोनू सूद यांच्या विरोधात कारवाई करण्याचा महानगरपालिका आणि पोलीस यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

१. सोनू सूद यांनी जुहू येथील एका निवासी इमारतीमध्ये व्यावसायिक वापरासाठी महापालिकेची अनुमती न घेता परस्पर पालट केले होते.

२. त्यासाठी महापालिकेने याआधी २ वेळा बांधकाम तोडल्याची कारवाई केली होती; परंतु प्रत्येक कारवाईनंतर त्यांनी त्याच जागी पुन्हा नव्याने बांधकाम केल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले होते.

३. त्यामुळे महापालिकेच्या वतीने सूद यांच्या विरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. या सर्व कारवाईच्या विरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.