बेळगाव महापालिकेसमोर भगवा फडकावण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले
बेळगाव – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा लाल-पिवळा ध्वज त्वरित हटवावा, अशी मागणी करत बेळगावकडे निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवरच रोखले. या वेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमारही केला. पोलिसांनी रोखल्याने शिवसैनिकांनी सीमेवरच ठाण मांडले. जोपर्यंत भगवा फडकावणार नाही, तोपर्यंत मागे फिरणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
#MaharshtraKarnatakaBorderDispute | बेळगाव महापालिकेसमोर भगवा फडकवण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखलं https://t.co/Z2tmrte2dm
— ABP माझा (@abpmajhatv) January 21, 2021
बेळगाव महापालिकेसमोर कन्नड रक्षक संघटनेने लाल-पिवळा ध्वज अनधिकृतरित्या लावला आहे. हा ध्वज त्वरित हटवावा, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर २१ जानेवारी या दिवशी भव्य मोर्चा आयोजित केला होता; मात्र या मोर्च्याला बेळगाव जिल्हा प्रशासनाने अनुमती नाकारली. तरीही ठरल्याप्रमाणे शिवसैनिक बेळगावमध्ये जाण्यासाठी निघाले; मात्र बेळगावकडे निघालेल्या या शिवसैनिकांना पोलिसांनी सीमेवरच रोखले.
दुसरीकडे बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगावचे जिल्हाधिकारी यांच्यात महापालिकेसमोर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी अनधिकृतपणे लावलेला वादग्रस्त ध्वज काढण्यासाठी बैठक चालू आहे.