कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २८ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत पन्हाळगड ते विशाळगड होणारी गडकोट मोहीम स्थगित ! – रावसाहेब देसाई, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अध्यक्ष
सांगली, २१ जानेवारी (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने वर्ष २०२१ ची धारातीर्थ यात्रा अर्थात मोहीम २८ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत पन्हाळगड ते विशाळगड (मार्गे पावनखिंड) अशी होणार होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनासंबंधीच्या शासकीय धोरणाला सहकार्य करण्यासाठी ही मोहीम स्थगित करण्यात येत आहे, असे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई यांनी घोषित केले आहे.