‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी घाला !
हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे प्रशासनाला निवेदन
तुळजापूर (जिल्हा धाराशिव), २१ जानेवारी (वार्ता.) – ‘अॅमेझॉन प्राईम’वर चित्रपट अभिनेते सैफ अली खान, डिंपल कपाडिया, मोहम्मद जीशान अय्यूब आणि गौहर खान यांची भूमिका असलेली, तसेच अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘तांडव’ ही वेब सिरीज नुकतीच प्रसारित झाली आहे. या वेब सिरीजमध्ये कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे. हिंदु देवतांचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून सर्व दोषींवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने २० जानेवारी या दिवशी नायब तहसीलदार शीतल कन्हेरे यांना देण्यात आले.
या वेळी धर्मप्रेमी श्री. राहुल इंगोले, श्री. संजय सोनवणे, श्री. विनायक माळी, सनातन संस्थेचे श्री. उमेश कदम, श्री. दीपक पलंगे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, ‘अॅमेझॉन’द्वारे देश आणि हिंदू विरोधी वेब सिरीज प्रसारित करून राष्ट्रविरोधी कृत्य केले आहे. त्यामुळे शासनाने ‘अॅमेझॉन’वरही कठोर कायदेशीर कारवाई करावी.