(म्हणे) ‘काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावेही पालटतील !’ – जावेद अख्तर, गीतकार
|
मुंबई – गुजरातचे माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितले की ‘ड्रॅगन फ्रूट’ हे कमळासारखे दिसते. त्यामुळे त्याचे नाव ‘कमलम्’ असे असायला हवे. शानदार. पहिले शहरांची नावे आणि आता फळांची. काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावेही पालटतील. खरेच हे सर्व मजेदार आहे, असे अत्यंत उपाहासात्मक ट्वीट हिंदुद्वेषी गीतकार जावेद अख्तर यांनी केले आहे.
The Hon CM of Gujarat has suggested that since the dragon fruit resembles the lotus flower it should be named Kamalam . Wonderful . Streets cities and now fruits . I won’t be surprised if some day the names of human limbs and parts are also changed . That will be real fun .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) January 20, 2021
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी ‘ड्रॅगन फ्रूट’चे नाव ‘कमलम्’ असे केले आहे. सध्या औरंगाबाद आणि धाराशिव यांची नावे पालटण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर अख्तर यांनी वरील ट्वीट केले आहे. (अख्तर, नसिरउद्दीन शाह यांसारख्यांना साम्यवादी पत्रकरांप्रमाणेच अशी व्यक्तव्ये करण्यासाठी कुठून पैसा येतो कि काय, अशा शंका राष्ट्रप्रेमींना आल्यास चूक ते काय ? – संपादक)