इंदूर (मध्यप्रदेश) येथील पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांच्या आश्रमात चांदीच्या पादुका आणि चंदनाच्या झाडांची चोरी

मध्यप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! भाजपचे राज्य असतांना अशा घटने घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

येथील चांदीच्या पादुका चोरीला गेल्या

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील खंडवा मार्गावरील पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांच्या आश्रमात चोरट्यांनी चांदीच्या पादुका आणि आश्रम परिसरातील चंदनाची झाडे चोरून पलायन केल्याची घटना घडली. सीसीटीव्हीमध्ये याचे चित्रण करण्यात आले आहे; मात्र त्यात चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून अन्वेषणास प्रारंभ केला  आहे.

(सौजन्य : Time News Indore)

आश्रमाचे व्यवस्थापक मुकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जानेवारीला रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास चोर आश्रमात घुसले. गेल्या मासाभरापासून आश्रम परिसरातील चंदनाची झाडे चोरीला जात आहेत; मात्र चोर हाती लागू शकले नाहीत.