सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील सुनावणी ५ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली !
नवी देहली – मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठासमोर २० जानेवारीला अंतिम सुनावणीला प्रारंभ होणार होता; मात्र न्यायालयाने सुनावणीला स्थगिती दिली. आता या प्रकरणावर ५ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या कार्यवाहीला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने हे प्रकरण ५ सदस्यीय घटनापिठाकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. तसेच आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची मागणी केली होती; मात्र ९ डिसेंबर २०२० या दिवशीच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला होता.