कर्नाटकमधील भाजप सरकार गोरक्षकांवरील गुन्हे मागे घेणार !
कर्नाटकातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! ‘असा निर्णय प्रत्येक भाजप शासित राज्यांत घेतला गेला पाहिजे’, असेच हिंदूंना वाटते !
बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यात गोरक्षण करतांना गोरक्षकांच्या विरोधात नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्यातील भाजप सरकारने घेतला आहे. राज्याचे पशूपालनमंत्री प्रभु चौहान यांनी ही माहिती दिली.
Karnataka minister says cases against ‘cow vigilantes’ will be withdrawn https://t.co/s5xat5j7zN
— TOI Cities (@TOICitiesNews) January 20, 2021
‘राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधातील गुन्हेही मागे घेण्यात येतील’, असे त्यांनी सांगितले.