गुजरात सरकारकडून ‘ड्रॅगन फ्रूट’ फळाचे ‘कमलम्’ असे नामांतर !
कर्णावती (गुजरात) – गुजरातमधील भाजप सरकारने ‘ड्रॅगन फ्रूट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या फळाचे ‘कमलम्’ (कमळ) असे नामांतर केले आहे. ‘या फळाला ड्रॅगन’ शब्द वापरणे योग्य नाही. ड्रॅगन हे फळ कमळासारखे दिसते. त्यामुळे या फळाला संस्कृत शब्दानुसार ‘कमलम्’ हे नाव देण्यात आले आहे’, असे राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी म्हटले आहे.
( सौजन्य : IBT Times India )
#Gujarat govt decides to rename #DragonFruit to #Kamalam. The Chief Minister said that the renaming was done because the fruit looked like a lotus. He also added that the word dragon is associated with #China pic.twitter.com/rBgeauPzIo
— Mirror Now (@MirrorNow) January 20, 2021
सध्या हे नाव गुजरातपुरतेच मर्यादित असणार आहे. गुजरातमधील कच्छ आणि नवसारी या भागांत शेतकरी कमलम्’ची शेती करतात. गुजरातच्या वन विभागाने भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे ‘ड्रॅगन फ्रूट’चे नाव पालटण्यासाठी याचिका केलेली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)