योजनाबद्ध पद्धतीने हिंदु धर्माला अवमानित करण्याचे काम केले जात आहे ! – कलाकार राजू श्रीवास्तव
अभिनेते आमिर खान, सैफ अली खान आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्याकडून योजनाबद्ध पद्धतीने हिंदु धर्माला अवमानित करण्याचे काम केले जात आहे ! – कलाकार राजू श्रीवास्तव
हिंदु धर्माचा वारंवार होणारा अवमान थांबण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे!
मुंबई – हिंदु धर्माला योजनाबद्ध पद्धतीने अपर्कीत करण्याचे कारस्थान रचले जात आहे. याला हिंदूच उत्तरदायी आहेत. हिंदूंमध्ये एकता नसल्यामुळे याचा लाभ अन्य धर्मातील व्यक्ती उचलत आहेत. ‘बॉलीवूड’ क्षेत्रातील काही निवडक धर्मांतील व्यक्तींकडून हिंदु धर्माला अवमानित करण्याचे काम केले जात असून यात ‘पिके’ चित्रपटातील अभिनेते आमिर खान, ‘तांडव’ वेब सिरीजमधील अभिनेते सैफ अली खान आणि ‘तांडव’ वेब सिरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्याकडून योजनाबद्ध पद्धतीने हे काम केले जात आहे, असा आरोप विनोदी कलाकार (कॉमेडियन) राजू श्रीवास्तव यांनी १९ जानेवारी या दिवशी केला.
राजू श्रीवास्तव पुढे म्हटले आहे की, हिंदु धर्माला अवमानित करण्यासाठी हिंदूच कारणीभूत आहेत. हिंदू हे राधेमा, राम रहीम यांसारख्या लोकांना मानतात; मात्र मंदिरात जातांना त्यांना लाज वाटते. हिंदूंना हाजी अली दर्गा, अजमेर दर्गा येथे जाऊन चादर चढवायला आवडते; मात्र ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या मंदिरात जाण्यासाठी हिंदूंना लाज वाटते.