चित्रपटांतून प्रत्येक वेळी हिंदु धर्मालाच लक्ष्य का करण्यात येते ? – मध्यप्रदेशचे भाजप सरकारचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा
‘तांडव’ वेब सिरीजवर कारवाई करण्यावरून समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी टीका केल्याचे प्रकरण
|
भोपाळ (मध्यप्रदेश) – हिंदु धर्माच्या विरोधात कोणताही विषय असला की, अखिलेश यादव यांच्यासारखे लोक ‘तांडव’ करतात. माझा त्यांना प्रश्न आहे की, आतापर्यंत जितके चित्रपट बनवण्यात आले आहेत, त्यात हिंदु धर्माच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्या धर्मावर टीका करण्यात आली आहे का ? हिंदु धर्माला सतत लक्ष्य का केले जाते, यावर कुणी ‘तांडव’ करत असेल आणि आम्ही त्याला विरोध करत असू, तर त्यात चुकीचे काय आहे, याचे उत्तर अखिलेश यादव यांनी दिले पाहिजे, असे आव्हान मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना दिले आहे.
(सौजन्य : IND24 EXCLUSIVE)
‘तांडव’ वेब सिरीजच्या विरोधात उत्तरप्रदेशात गुन्हा नोंदवून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे. यावरून अखिलेश यादव यांनी विचारले होते की, ‘तांडव’वर एवढा गदारोळ का ? काही मासांपूर्वी मिर्झापूर वेब सिरीज आली होती. त्यात कुठे चांगली भाषा होती? त्यातून उत्तरप्रदेशचा अवमान झाला. याविषयी उत्तरप्रदेश सरकार का गप्प बसली?, असा प्रश्न उपस्थित केले होता. त्यावर मिश्रा यांनी वरील आव्हान दिले.