मगोपचे माजी आमदार लवू मामलेदार ६ वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ
फोंडा, १८ जानेवारी (वार्ता.) – मगो पक्षाच्या सर्वसाधारण बैठकीत ठराव घेऊन मगो पक्षाचे मुख्य सचिव आणि माजी आमदार लवू मामलेदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. यानुसार त्यांना पुढील ६ वर्षांसाठी पक्षातून बाहेर ठेवण्यात येईल. या वेळी पक्षाचे अध्यक्ष श्री. दीपक ढवळीकर यांनी मगो पक्ष नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. मगोपचे नेते श्री. सुदिन ढवळीकर म्हणाले, ‘‘अशी तरतूद केली आहे की, कोणताही नेता किंवा आमदार मगो पक्षाचे इतर पक्षात विलिनीकरण करू शकणार नाही. एक दिवस असा येईल की, ज्या वेळी पक्ष विधानसभा निवडणुकीत २१ जागांवर निवडून येईल.’’