हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त ट्विटरवर #21YearsOfSanatanPrabhat या हॅशटॅगद्वारे व्यापक धर्मप्रसार !

मुंबई – हिंदी पाक्षिक सनातन प्रभातला नुकतीच २१ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने १६ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘धर्मसंवाद’मध्ये पाक्षिकाचा ऑनलाईन वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर १७ जानेवारी या दिवशी ‘ट्विटर’वरून #21YearsOfSanatanPrabhat नावाचा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला. सनातन प्रभातचे वाचक, हितचिंतक, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी हा ट्रेंड केला.

या ट्रेंडच्या माध्यमातून १५ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या. यामध्ये सनातन प्रभातची एकमेवाद्वितीय वैशिष्ट्ये, उद्देश, राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्या रक्षणार्थ सनातन प्रभातने आतापर्यंत केलेले कार्य, संतांनी सनातन प्रभातविषयी वेळोवेळी काढलेले गौरवोद्गार आदी विषय घेऊन ट्वीट्स करण्यात आल्या.

या माध्यमातून लाखो हिंदूंपर्यंत सनातन प्रभातचा हिंदु राष्ट्र स्थापनेच्या विचाराचा प्रसार झाला. टेलिग्राम, ट्विटर, फेसबूक, डेली हंट या विविध प्रकारच्या सामाजिक माध्यमांवरील ‘सनातन प्रभात’च्या खात्यांचा प्रसारही करण्यात आला. हिंदूंना सनातन प्रभात नियतकालिकांचे वर्गणीदार होण्याचे आवाहनही करण्यात आले.