५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील कु. आदित्य राहुल राऊत (वय ११ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. आदित्य राहुल राऊत एक आहे !
‘पौष शुक्ल पक्ष तृतीया (१६.१.२०२१) या दिवशी कु. आदित्य राहुल राऊत याचा ११ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या आजीला त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तऱ्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ |
१. ऐकण्याची वृत्ती
‘कु. आदित्य स्वभावाने अत्यंत शांत आणि गुणी आहे. त्याला घरातल्या मोठ्या माणसांनी काही सांगितले, तर तो लगेच ऐकतो आणि त्याप्रमाणे कृती करतो.
२. स्वावलंबी
तो जेवल्यावर त्याचे ताट आणि वाटी स्वतः घासून-पुसून ठेवतो.
३. व्यवस्थितपणा
त्याला घरातील प्रत्येक वस्तू व्यवस्थित ठेवलेली आवडते.
४. घरकामांत साहाय्य करणे
त्याला नवीन गोष्टी शिकण्याची पुष्कळ आवड आहे. तो त्याच्या काकूला (सौ. समृद्धी राऊत हिला) स्वयंपाकघरातील कामे शिकवण्यास सांगतो. तो त्याच्या काकूला घरकामात पुष्कळ साहाय्य करतो.
५. आवडनिवड नसणे
त्याला जेवणात काहीच आवडनिवड नाही. तो समोर असेल, ते आवडीने प्रसाद समजून ग्रहण करतो.
६. साधनेची आवड
अ. आदित्यला साधनेची पुष्कळ आवड आहे.
आ. आमच्या घरी अग्निहोत्र करतात. तो नियमित अग्निहोत्राची सिद्धता करतो.
इ. तो सांगितलेली सेवा मन लावून करतो. सेवा झाल्यावर चुका विचारतो आणि त्या सांगितल्यावर क्षमाही मागतो.
७. आदित्यचे दोष
अनावश्यक बोलणे आणि भीती वाटणे
– सौ. अंजली मनोहर राऊत (आदित्यची आजी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१.२०२१)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |