ममता बॅनर्जी ‘इस्लामी आतंकवादी’ ! – उत्तरप्रदेशातील भाजपचे मंत्री आनंद स्वरूप शुक्ला
बलिया (उत्तरप्रदेश) – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांना भारतियतेवर विश्वास नाही. त्या ‘इस्लामी आतंकवादी’ आहेत. त्यांनी बंगालमध्ये हिंदु देवतांना अपमानित करण्याचे आणि मंदिरे पाडण्याचे काम केले आहे. त्या बांगलादेशच्या इशार्यावर काम करतात. रोहिंग्या मुसलमानांना नागरिकत्व देणे, हिंदूंना त्यांचे सण साजरे करू न देणे यांसारख्या गोष्टी ममता बॅनर्जी बंगालमध्ये करत आहेत. त्यामुळे बंगालमध्ये होणार्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांचा दारूण पराभव होईल आणि निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांना बांगलादेशमध्ये आश्रय घ्यावा लागेल, असा दावा उत्तरप्रदेशचे संसदीय कार्यमंत्री आनंद स्वरूप शुक्लला यांनी केला. ते बलिया येथे पत्रकारांशी बोलत होते.
शुक्ला पुढे म्हणाले की, ममता केवळ मुसलमानांच्या नेत्या आहेत. त्या हिंदूंवर अत्याचार करत आहेत. बंगालमधील जनतेने निवडणुकीमध्ये ममतांना सत्तेतून खाली खेण्याचा निश्चय केला आहे. देशात ‘भारतमाता की जय’ आणि ‘वन्दे मातरम्’ म्हणणार्या मुसलमानांचाच भारतात सन्मान केला जाईल.
Mamata Banerjee has become complete Bangladeshi & is working on the directions of islamic terrrorists there. She has become the biggest danger for the country. After her defeat in West Bengal assembly polls, she’ll be ready to take refuge in Bangladesh: State Min Anand S Shukla pic.twitter.com/b6dEvzyZQn
— ANI UP (@ANINewsUP) January 17, 2021
( सौजन्य : FASTMAIL NEWS )